अभ्यास व लेखन
अभ्यास व लेखन
संदीप आ. चव्हाण
वैयक्तिक माहिती
नाव: संदीप आ. चव्हाण
वास्तव्य पुण्यात असते. (मूळ गाव – वाणेवाडी, बारामती)
शिक्षण आणि नोकरी
संदीप चव्हाण यांनी ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’तून ‘आरोग्यसेवांचे व्यवस्थापन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. २०११ पासून ते सार्वजनिक आरोग्य सेवा (Public Health Services) क्षेत्रात संस्थात्मक पातळींवर देशात विविध राज्यांतील दुर्गम भागात संस्थात्मक पातळीवर प्राथमिक आरोग्य सेवा, माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
सामाजिक कार्य :
संदीप चव्हाण ‘सहजकर्ता प्रतिष्ठान’ या संस्थेचे संस्थापक आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागात प्रतिष्ठान तर्फे मानसिक आरोग्य जनजागृती, उपचार आणि संवर्धनाचे कार्य चालते. वाणेवाडी ह्या त्यांच्या मूळ गावी गरजू गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी २०२१ पासून ‘विवेकदिशा’ अभ्यासिका चालवली जाते. वैयक्तिक पातळीवर आरोग्यभान, जागृती पब्लिक चारीटेबल ट्रस्ट, लक्ष्य, सावली ट्रस्ट, रामकृष्ण मिशन ह्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांशी सार्वजनिक आरोग्याशी निगडीत असलेल्या कार्यांत योगदान देतात. संदीप चव्हाण यांना वाचन, इतिहास निरीक्षण, दुर्ग भ्रमंती, सायकल भटकंती, खाद्य व लोकसंस्कृतीचा अभ्यास असे छंद आहेत.
लेखन:
‘थिंक महाराष्ट्र’ वेब पोर्टल वर पाच लेख मराठी मध्ये प्रकाशित. Village Square, Civil Society, The Wire, Nivarana ह्या सामाजिक विषयांवर आधारित माहिती देणाऱ्या वेब पोर्टल्स वर सात लेख इंग्रजीत प्रकाशित. सामाजिक क्षेत्रात देशाच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या व्यक्तींचे चरित्र Gems of Purest Ray Serene ह्या पुस्तकात आहे, त्यांतील दोन व्यक्तींचे चरित्र तसेच त्यांच्या सामाजिक कार्याबाबत लिखाण केले आहे.