संशोधन व तत्सम लेखनकार्य :
चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण (१९२८)
Tribes and castes in Central Provinces
Anthropometric Measurements of Maratha (१९४८)
मराठी लोकांची संस्कृती (१९५१)
Kinship Organization in India (Deccan College, 1953) भारतातील बंधुत्व संघटन
Hindu Society – an interpretation (Deccan College, 1961)
हिंदू समाजः एक अन्वयार्थ (मूळच्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद इरावतीबाईंचे पती दिनकर कर्वे यांनी केला.)
हिंदू समाजरचना (१९६४)
Group Relations in Village Community (1963)
The Social Dynamics of a Growing Town and Its Surrounding Area (1965)
Maharashtra: Land and its People (1968) महाराष्ट्र: एक अभ्यास
Indian Women (1966)
महाराष्ट्रातील धनगर – एक संशोधन प्रकल्प (१९६९)
इरावती कर्वे यांचे ललित साहित्य :
परिपूर्ती (१९४९)
भोवरा (१९६०)
युगांत (१९६७)
गंगाजळ (१९७२ – मृत्युपश्चात प्रकाशित)
इरावती कर्वे यांचे गाजलेले मुख्य लेख / अहवाल :
ग्राम मनाचा समाजशास्त्रीय अभ्यास
जाती जमातीतील स्त्री पुरुषांचे शरीर मापन आणि रक्त-समूहाचे परीक्षण
गांधीहत्येनंतर प्रक्षोभाबद्दलचा लेख
Essay on the projected status of Indian women (1975)
पुरुषांच्या द्वितीय विवाहाचे समर्थन करणारा लेख
वाटचाल
जन्मांतरीची भेट
पुस्तिका:
मराठी लोकांची संस्कृती
आमची संस्कृती
संस्कृती
धर्म
इरावती कर्वे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करणारे साहित्य
इरावती कर्वे यांचे कार्य आणि जीवनचरित्र विस्ताराने प्रामुख्याने पुढील पाच पुस्तकांत आढळते:
Iru – Remarkable life of Irawati Karve:
इरावती कर्वे यांच्या कनिष्ठ कन्या गौरी देशपांडे यांची कन्या उर्मिला देशपांडे म्हणजे इरावती कर्वे यांच्या नात. इरावतीबाईंच्या मृत्यूच्या वेळी त्या सात वर्षांच्या होत्या. उर्मिला देशपांडे आणि थियागो पिंटो बार्बोसा (ब्राझील मधील मानववंशशास्त्रज्ञ) या दोघांनी ‘इरु’ हे पुस्तक लिहिले आहे. इरावतीबाईंच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी आणि कार्याविषयी सखोल माहिती आणि दृष्टिकोन यातून प्राप्त होतो.
In the cause of Anthropology – The life and work of Irawati Karve:
नंदिनी सुंदर या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी इरावती कर्वे यांच्या आयुष्यावर अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. इरावतीबाई व त्यांचे कार्य तांत्रिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे.
Anthropologist Irawati Karve: मराठीमध्ये उपलब्ध
डॉ. रामचंद्र मुटाटकर यांनी १९६० मध्ये, वयाच्या तेविसाव्या वर्षी इरावती कर्वे यांनी पुणे विद्यापीठात स्थापन केलेल्या Anthropology (मानववंशशास्त्र) विभागात काम करायला सुरुवात केली. जवळपास दहा वर्षे इरावती कर्वे यांच्याबरोबर त्यांनी काम केले. डॉ. मुटाटकर स्वत: देखील मानववंशशास्त्रज्ञ असल्याने, त्यांनी मानववंशशास्त्राच्या अनुषंगाने लिहिलेले पुस्तक तांत्रिकरीत्या इरावती यांच्या कार्याची विस्तृत माहिती देते. इरावती कर्वे यांच्या प्रोत्साहनामुळे मुटाटकर यांनी सार्वजनिक आरोग्य (Public Health) विषयात वैद्यकीय मानववंशशास्त्र (Medical Anthropology) या नवीन उपशाखेचा प्रसार करण्यात यश मिळवले. आजमितीस ही शाखा बऱ्यापैकी विकसित झाल्याचे दिसते.
इरावती कर्वे – व्यक्ती आणि वाङमय:
डॉ. उषा कोटबागी या मराठी विषयाच्या प्राध्यापक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी इरावतीबाईंच्या चरित्राचा अभ्यास करून साहित्यक्षेत्रातील इरावती कर्वे यांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले आहे.
प्रतिभा काणेकर यांचे पुस्तक:
नुकतेच प्रकाशित झालेले प्रतिभा काणेकर यांचे मराठी भाषेतील पुस्तक इरावती कर्वे यांच्या जीवन पटाचे समग्रपणे दर्शन घडवते.