१५ डिसेंबर १९०५: ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) म्यिंज्यान येथे इरावती करमरकर यांचा जन्म.
१९११: इरावती वयाच्या सहाव्या वर्षी पुण्याच्या हुजूरपागा शाळेत शिक्षणासाठी दाखल.
१९११: रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे आणि त्यांच्या पत्नी सई यांनी इरावतीला आपल्या घरी राहण्यासाठी बोलावले.
१९२२: इरावती वयाच्या सतराव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्या.
१९२६: इरावती यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. पदवी प्राप्त केली. याच सुमारास त्यांची कर्वे कुटुंबाशी ओळख झाली.
१९२६: इरावती करमरकर व दिनकर कर्वे यांचा विवाह झाला.
१९२८: इरावती कर्वे यांनी मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात एम.ए. ची पदवी प्राप्त केली.
१९२८ (जून): इरावती कर्वे पीएचडी करण्यासाठी जर्मनीला निघाल्या.
१९२८-१९३०: इरावती कर्वे यांनी बर्लिनमधील फ्रेडरिक विलेन्हेम विद्यापीठात प्रा. ऑयगेन फिशर यांच्या मार्गदर्शनाखाली मानववंशशास्त्रात संशोधन केले आणि १९३० मध्ये पीएचडी पदवी मिळवली.
१९३१: इरावती कर्वे भारतात परतल्या आणि महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णासाहेब) यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी (SNDT) शिक्षण संस्थेत रुजू झाल्या. त्यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारी स्वीकारली.
१९३२: इरावती व दिनकर कर्वे यांची पहिली मुलगी जाईचा जन्म झाला.
१९३६: इरावती व दिनकर कर्वे यांचा मुलगा आनंदचा जन्म झाला.
१९३९: इरावती कर्वे यांनी डेक्कन कॉलेज, पुणे येथे ‘प्रपाठक’ म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९३९: भारतीय विज्ञान काँग्रेसच्या मानववंशशास्त्र विभागाच्या अध्यक्षपदाचा मान इरावती कर्वे यांना मिळाला.
१९४१-१९६३: गुजरातमधील लांघणज येथे भारतीय पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात इरावती कर्वे आणि प्रा. हसमुख सांकलिया यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
१९४२: इरावती व दिनकर कर्वे यांची धाकटी मुलगी गौरीचा जन्म झाला.
१९४६: इरावती कर्वे यांना लंडनच्या रॉयल अँथ्रोपोलॉजिकल संस्थेची एम्सली हॉर्निमन स्कॉलरशिप मिळाली.
१९४७: दिल्लीत आयोजित राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसच्या मानववंशशास्त्र विभागाचे अध्यक्षपद इरावती कर्वे यांनी भूषवले.
१९५१: लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS) मध्ये इरावती कर्वे यांना अतिथी व्याख्याता म्हणून आमंत्रित करण्यात आले.
१९५१: इरावती कर्वे यांनी अमेरिकेतील विविध विद्यापीठांना भेटी देऊन मानववंशशास्त्रावरील चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला.
१९५३: इरावती कर्वे यांचा ‘किन-शिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा अजरामर ग्रंथ प्रसिद्ध झाला.
१९५९-१९६१: इरावती कर्वे बर्कले विद्यापीठात (अमेरिका) अतिथी प्राध्यापक म्हणून दोन वर्षांसाठी कार्यरत होत्या.
१९६१: इरावती कर्वे यांच्या अभ्यासावर आधारित ‘हिंदू समाज – एक विवेचन’ हा ग्रंथ प्रकाशित झाला.
१९६३: इरावती कर्वे भारतात परतल्या आणि पुणे विद्यापीठात स्वतंत्र मानववंशशास्त्र विभाग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
१९६५: इरावती कर्वे आणि श्री रणदिवे यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण शहराच्या सामाजिक गतीवर अभ्यास केला.
१९६६: इरावती कर्वे यांनी कोयना धरणग्रस्तांचा अभ्यास करून त्यांच्या समस्यांचे विश्लेषण केले.
१९६७: इरावती कर्वे यांचा महाभारतावर आधारित ‘युगांत’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला.
१९६८: ‘युगांत’ ग्रंथास साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन यांचा पुरस्कार लाभला.
१९७०: इरावती कर्वे आणि हेमलता आचार्य यांनी दुर्गम भागातील आदिवासी आठवडे बाजारांचा अभ्यास केला.
११ ऑगस्ट १९७०: इरावती कर्वे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदय विकाराने निधन झाले.